वटपोर्णिमा ( जेष्ठी पौर्णिमा ) : महत्व, इतिहास, आणि सर्वकाही - Vatpornima : Importance, history, & All about it

वटपोर्णिमा ( जेष्ठी पौर्णिमा / बरगत कि पुजा ) : महत्व, इतिहास, आणि सर्वकाही


काय आहे या मराठी सन वटपौर्णिमेचे महत्व, सत्यवान आणि सावित्रीची कथा, वटवृक्षाचे महत्व, वटवृक्षाचे २५ फायदे आपण हे सर्व काही आज जाणून घेऊ. 
Content :- 

१. मराठी सन वटपौर्णिमेचे महत्व  : 

  • वटपौर्णिमेला सर्व स्त्रिया अगदी हजारो वर्ष म्हणजेच सावित्रीच्या काळापासुन हिंदु जेष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वडाला पुजण्यासाठी जातात. 
  • पुर्वी महिला तीन दिवसांचा उपवास करत आणि वटपौर्णिमेला पुजा आणि वाण वाटप केल्यानंतर त्या उपवास सोडायच्या परंतु आताही काही महिला करतात परंतु सहसा एक दिवसाचाच उपवास आता महिला करतात. 
  • वाण देणे म्हणजे एक आपापसातील प्रेम, गोडी तसेच ते एक महान दान समजले जाते. 
  • सावित्रीने आपल्या पती सत्यवानाचे प्राण वडाच्या म्हणजेच वटवृक्षाच्या झाडाखालीच तारले होते, वटवृक्ष हा सर्वात जास्त प्राणवायु देणारा वृक्ष आहे त्यामुळेच सत्यवानही आपले प्राण स्वर्गात जाण्यापासुन थांबवू शकला होता. 

मराठी सन वटपौर्णिमेचे महत्व

  • या जेष्टी पौर्णिमेला महिला वडाला सुताचे सात धागे सात वेळा प्रदिक्षणा घालुन बांधतात आणि सात जन्म हाच पती मिळू दे अशी प्रार्थना करतात.
  • वटवृक्ष प्राणवायु देतो म्हणुन त्याचे सानिध्य आणि त्याची पुजा आपण करत आलो आहोत परंतु आजकाल लोक वटवृक्ष शोधत कुठे जावे म्हणुन त्याच्या फांद्याच तोडून आणतात आणि आपल्या कॉलोनीत किंवा गल्लीत त्याची पूजा करतात. 
  • तर हे बरे नव्हे आपण त्या वटवृक्षाचेच प्राण घेत आहोत जो कि आपल्याला तारात आहे. म्हणून आपण सर्वांनी या वटपौर्णिमेपासुन आपल्या गल्लीत, कॉलोनीत एक तरी वटवृक्ष लावा जेणेकरून पुढच्यावर्षी तुम्हाला कुठे जावे लागणार नाही आणि शुद्ध हवासुद्धा मिळेल. 
 

२. सत्यवान-सावित्री पासुन वटपौर्णिमा :-

सत्यवान-सावित्री पासुन वटपौर्णिमा

२.१ राजा अश्वपती आणि सावित्री :

  • सावित्री म्हणजे राजा अश्वपतींची मुलगी होती, लहानपणापासुन तीचा सांभाळ राजांनी खूप जीव लावुन आणि प्रेमाने केला होता. 
  • सावित्री जशी जशी मोठी मोठी होऊ लागली राजांना तिच्या लग्नाची काळजी भेडसावु लागली तसेच सावित्री आता आपल्यापासुन दुर जाणार याचीही चिंता राजा अश्वपतींना होऊ लागली.

२.२ राजा द्युमत्सेन आणि सत्यवान :

  • तर दुसरीकडे राजा द्युमत्सेन युद्धामध्ये आपलं सगळं राज्य गमावुन बसला, तो खुप दुःखी आणि निराश झालेला होता. 
  • राजा द्युमत्सेन आणि त्याची पत्नी दोघेही अंध होते व त्यांना सत्यवान नावाचा मुलगा होता, सत्यवान हा धर्मप्रिय आणि आई-वडिलांची सेवाप्रिय होता.
  • अंध असतानाही राजाने आपला मुलगा आणि पत्नीसह वनात जाऊन राहण्याचे ठरवले. अशाप्रकारे वनात त्यांच्या परिवाराची नैसर्गिग जीवनचर्या चालू झाली होती. 
राजा द्युमत्सेन आणि सत्यवान

२.३ सावित्री आणि सत्यवानाची भेट :

  • सावित्री आता मोठी झाली होती, त्यामुळे राजा अश्वपतींनी तीच्यासोबत लग्नाबद्दल चर्चा केली आणि तिच्यासाठी स्वयंवराची योजना आखली. परंतु असे बरेच दिवस चालल्या नंतरही सावित्रीला काही तिच्या पसंतीचा वर मिळत नव्हता. 
  • सावित्री असेच एकदा वनात शिकार करण्यासाठी आपल्या सैनिकांसोबत गेली असता तिला तिकडे सत्यवान आपल्या आई-वडिलांची सेवा करताना दिसला, त्याचक्षणी तीने त्याला आपला पती म्हणुन मान्य केले.

२.४ नारदमुनींची भविष्यवाणी आणि सावित्रीचा विवाह :

  • सावित्री राजवाड्यात परतल्यास तीने घडलेली सर्व गोष्ट राजा अश्वपतींना सांगीतली, राजांनाही हि बातमी ऐकून खुप आनंद झाला. लगेच राजांनी सत्यवान व त्याच्या परिवाराबद्दल सर्व माहिती काढली व राजा त्यांच्या विवाहासाठी तयार झाला.

नारदमुनींची भविष्यवाणी आणि सावित्रीचा विवाह
  • हि संपुर्ण गोष्ट नारद मुनींना कळताच नारदांना सत्यवानाची भविष्यवाणी सामोरे आली, त्यात काहीतरी विपरीत होते म्हणुन नारदमुनी तातडीने राजा अश्वपतींकडे गेले व त्यांनी सावित्रीलापण लगेचच समोर बोलावण्यास सांगितले. 
  • सावित्री आणि राजा अश्वपती या दोघांच्यासमोर नारदांनी त्यांची सत्यवानाबद्दलची भविष्यवाणी सांगितली. त्यामध्ये देवर्षी नारदांनी सांगितले कि सत्यवानाचे आयुष्य हे फक्त एक वर्षाचे बाकी आहे.
  • हे ऐकल्यानंतर राजा अश्वपती आणि सावित्री दोघांनाही खुप दुःख झाले परंतु राजपुत्री सावित्रीने आपला निर्णय लगेचच सुनावला कि, मी तरीही सत्यवान यांच्याशीच विवाह करणार आहे कारण मी माझा विचार आता कोणत्याही कारणामुळे बदलु नाही शकत. 

२.५ सत्यवानाशी विवाह आणि सतीचे वनजीवन :

  • राजा अश्वपतींनी सावित्रीचा विवाह सत्यवानासोबत खुप जल्लोषात आणि थाटामाटात करून दिला आणि राजा द्युमत्सेन व सत्यवानाला आपल्या राज्यातच महल आणि  धनसंपत्ती देऊ केली, परंतु त्यांनी ती नाकारली. 
  • त्यानंतर सावित्रीनेही आपले सर्व दाग-दागीने व राज-परिवारीक वस्त्र त्यागुन साध्याश्या वेषामध्ये ती सासरी गेली. तिथे तिने आपल्या अंध सासु-सासऱ्यांची खुप जीव सेवा केली. तसेच आपल्या नवऱ्यासोबत ती कामही करत असे आणि त्यांची मनःपुर्वक सेवाही करत असे. 
  • असेच बघता बघता दिवसांवर दिवस निघुन गेले आणि सत्यवानाचा या जगातुन परतीचा दिवस आला.

२.६ सत्यवानाची शेवटची घटका :

सत्यवानाची शेवटची घटका
  • सत्यवान रोजच्याप्रमाणे अग्निहोत्र जंगलात लाकुड तोडण्यासाठी निघाला होता,सत्यवानाचा तो शेवटचा दिवस आलेला होता म्हणुन सावित्रीला खूप चिंतीत होती. म्हणुन तिने सत्यवानाकडे तीलाही सोबत जंगलात घेऊन जाण्याची मागणी केली. 
  • त्यानंतर ते दोघे सत्यवानाच्या आई वडिलांची परवानगी घेऊन जंगलात गेले. सत्यवान लाकुड तोडण्यासाठी कुऱ्हाडी घेऊन झाडावरती चढला व सावित्री खालीच थांबलेली होती. 
  • काही कालावधी जाताच सत्यवान घाई घाईने कुऱ्हाडी फेकुन देऊन खाली उतरला व सावित्रीला त्याने चक्कर येत असल्याचे सांगितले. सावित्रीने त्याचे डोके आपल्या मांडीवरती घेऊले व त्याला आपल्या पदराने त्याला हवा घालू लागली. 
  • तेवढ्यात त्यांच्यासमोर सुर्यासारखे तेज असलेला काळ्या रंगाच्या देवपुरुषाला आपल्या वाहन रेड्यावरती येताना पाहिले, तो देवपुरुष जवळ येताच सावित्रीने त्यांना नमन करून त्यांना तुम्ही कोण आहात असे विचारले. 
  • त्या देवपुरुषाने सावित्रीला सांगितले कि मी यमदेव आणि मी तुझ्या पतीच्या आत्म्याला घेऊन जाण्यासाठी आलेलो आहे. असे म्हणुन यमदेवाने सत्यवानाच्या सुष्मरूपी आणि तेजोमयी आत्म्याला आपल्याकडे खेचले व सत्यवानाचा देह अशाप्रकारे निर्जीव झाला. 

२.७ सत्यवान-सावित्री आणि यमदेव :

  • सावित्री यमदेवांकडे आशमयी नजरेने पाहत होती, परंतु यमदेव सत्यवानाच्या सुष्मरूपाला घेऊन दक्षिणेकडे निघाला, सावित्रीही यमदेवांच्या पाठीमागे दुरपर्यंत गेली. 
    सत्यवान-सावित्री आणि यमदेव
  • यमदेवांनी तिला बऱ्याचवेळा समजावुन सांगितले परंतु ती काही थांबतच नव्हती, शेवटी यमदेव आपल्या रेड्यावरतुन खाली उतरून तीला म्हणाले कि तुझ्या या अप्रतिम पतिव्रतेमुळे माझे दुत तुझ्या पतीला घेऊन जाण्यासाठी नाही येऊ शकले. 
  • यमदेव म्हणाले कि मी नियतीच्या नियमापुढे काहीही करू शकत नाही, तुझ्या सासु-सासऱ्यांना दृष्टी वरदान म्हणुन देतो, पण सतीला हे कबुल नव्हते. त्यानंतर यमदेवाने सावित्रीच्या सासऱ्याचे गेलेले राज्य, धन संपत्ती तीला देऊ केली, हेही सतीला हे कबुल नव्हते, त्यानंतर सावित्रीच्या वडिलांना १०० पुत्र दिले. 
  • अशाप्रकारे यमदेवाने सतीला वापस जाण्यास सांगितले, परंतु सावित्री वापस जाण्यासाठी तयारच होत नव्हती, मग यमदेवाने सतीला तीच्या पतीला सोडुन काहीही मागण्यास सांगितले.  
  • सावित्रीने तिला सत्यवानाकडुन १०० पुत्रप्राप्ती अशी इच्छा मागितली, तेव्हा यमदेवाने तिला काहीही विचार न करता तथास्तु म्हणुन आशीर्वाद दिला परंतु यमदेवांना मागितलेल्या इच्छेचा अर्थ नंतर समजला. 
  • आणि अशाप्रकारे धर्मसंकटात सापडलेल्या यमदेवांना सत्यवानाचा प्राण परत करावा लागला आणि पतिव्रता सावित्रीचा अशाप्रकारे विजय झाला. 

३ वटवृक्षाचे / वडाचे महत्व, फायदे  : सावित्रीची वटपौर्णिमा 

३.१ वटवृक्षाचे महत्व : 


वटवृक्षाचे / वडाचे महत्व, फायदे  : सावित्रीची वटपौर्णिमा
  • वटवृक्ष म्हणजे अक्षयवृक्ष , याचा अर्थ ज्याचा कधी अंत होत नाही कारण कि वटवृक्षाला ज्या पारंब्या असतात त्या पारंब्या वाढल्या नंतर जमिनीत जाऊन त्यापासुन नवीन वृक्ष होत असतो. अशाप्रकारे बऱ्याच ठिकाणी वडाची जंगले तयार झालेली आपणास पाहायला मिळतात. 
  • एक पुर्ण वाढ झालेला वटवृक्ष ६५०-७०० kg किलो इतका प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन देतो. वडाच्या वाळलेल्या फांद्यांचा उपयोग ब्राम्हण लोक आणि पुर्वीचे साधू होमहवनामध्ये करतात त्यामागेही हेच कारण आहे. 
  • वटवृक्ष हे शिवस्वरूप मानले जाते आणि त्याच्या पारंब्या ह्या शिव महादेवाच्या जात मानल्या जातात.     

३.२ वटवृक्षाचे फायदे / बरगत पेड : 


दमा : वटवृक्षाची पाने जाळल्यानंतर जी राख असते ती राख जर पाण्यात टाकून पिली तर दम्याचा आजार बारा होतो.
वटवृक्षाची पाने


जळाल्यास किंवा भाजल्यास : वटवृक्षाच्या वाळलेल्या पानाची बुकटी करून दह्यामध्ये मिसळुन लावल्यास जखम लवकर बारी होते व त्राससुद्धा कमी होते . 

सुज आल्यास : वडाच्या पानाला तुप लावुन कपड्याने सूज आलेल्या ठिकाणी बांधल्यास सुज कमी होते. 

केसगळती : वटवृक्षाची वाळलेल्या पानांची बुकटी करून खोबऱ्याच्या तेलामध्ये मिसळुन लावल्यास केसगळती कमी होते. 

विंचू चावल्यास : वडाचा चीक विंचु चावल्यास लावल्यावर त्याचा प्रादुर्भाव कमी होतो परंतु त्यानंतरही दवाखान्यात दाखवावे. 
vatvruksha साल


दात दुखणे : वडाची साल, कात आणि काळी मीरी यांच्या समप्रमाणात घेऊन जर रोज रात्री दात घासले तर दंत-दुखी कमी होते. 

दातांची कीड : किडलेल्या दातांमध्ये जर वटवृक्षाचा चीक म्हणजेच त्याचे पांढरे दुध जर टाकले तर कीड कमी होते. 

दातांची स्वच्छता : लिंबाच्या फांदयांसारखेच जर आपण वडाच्या कोवळया फांद्याने जर दात घासले तर निष्कर्ष सारखाच मिळेल . 

नाकातुन रक्तस्त्राव : वडाच्या दुधाचे २-३ थेम्ब जर नाकात टाकले तर रक्तस्त्राव थांबतो. तसेच वडाच्या पारंब्यांची पावडर जर दुधात टाकून पिली तरीही रक्तस्त्राव होण्याचे प्रमाण कमी होते . 

हाता-पायाला गाठी येणे : वडाचे दुध आणि खडी मीठ दोन्ही मिसळुन गाठी आलेल्या ठिकाणी त्याचा लेप लावावा, आणि त्यावर वटवृक्षाची साल लावावी आणि कपड्याने बांधावे असे काही दिवस करत राहावे गाठी कमी होतील . 

अतिझोप आणि जांभळ्या येणे : वडाच्या पानांची ५ ग्राम बुकटी तांब्याभर पाण्यात घेऊन ते पाणी अर्ध्यापेक्षा कमी होईपर्यंत उकळावे आणि राहिलेल्या पाण्यात थोडेशे मीठ टाकुन पिल्यास अतिझोप आणि आळस कमी होतो. 
वड parambya

पांढरा त्वचेवरचा कोड : वडाचे दुध कोड आलेल्या ठिकाणी लावावे, आणि त्यावर वटवृक्षाची साल लावावी आणि कपड्याने बांधावे असे काही दिवस करत राहावे कोड कमी होइल . 

सर्दी, खोकला, डोकेदुखी : वटवृक्षाची तांबूस रंगाची पाने सावलीतच काही दिवस ठेवावीत आणि वाळल्यानंतर त्यांची बुकटी करून पाण्यात टाकुन पाणी अर्धे होईपर्यंत उकळावीत आणि हे पाणी २-३ वेळा वाटीभर प्यावे त्याने व्हायरल इन्फेक्शन कमी होते. 

चेहऱ्यावरील व शरीरावरील येणारे फोड : वटवृक्षाचे दुध फोड आलेल्या ठिकाणी लावत राहिल्यास तो फोड लवकर फुटतो आणि नंतर त्यावर वादाची कोवळी पानांचा लेप करून लावावा म्हणजे त्या ठिकाणी फोड येने कमी होते. 

हृदयविकार आणि बीपि : वडाची कोवळी पाने वाटुन ती पाण्यात उकळावीत आणि ते पाणी २-३ वेळा पीत राहावे त्याने हृदयविकार आणि बीपि प्रमाण कमी होते. 

जखम, चिघळलेली जखम : जर जखम कमी असेल तर वडाच्या पानांचा लेप त्यावर लावल्यास जखम कमी होते. जर जखम जास्त चिघळली असेल तर वटवृक्षाचे दूध त्यावर टाकल्यास इन्फेक्टशन कमी होऊन जखम लवकर भरते. 
 
टाचेच्या आणि तळपायांच्या भेगा :  वटवृक्षाचे दुध म्हणजेच चीक भेगांमध्ये टाकून तो सुकेपर्यंत तसाच ठेवावा असे काही दिवस करत राहिल्यास भेगा भरून येतात. 

तोंड येणे : वडाच्या सालीची बुकाती करून ती पाण्यात टाकुन व्यवस्थित मिसळवुन गुळण्या करत राहिल्यास तोंड येणे बरे होते. 

हात, पाय, कंबर दुखणे : वडाच्या चिकाने मालिश करावी, दुखणे कमी होते . 

मधुमेह : वाडाची साल आणि पारंब्यांची बुकाती करून पिट राहावे मधुमेह कमी होतो. 

नपुंसकता : वडाचे दुध ८-१० थेम्ब दुधात टाकून प्यावे. 

मूळव्याध :  वडाची साल पाण्यात पाणी अर्धे होईपर्यंत उकळावी आणि ती तूप आणि साखर यासोबत मिसळुन काही दिवस खावी.  

उन्हाळी लागणे : वडाच्या पानांचा जुस करून २-३ वेळेस पिल्यास उन्हाळी कमी होते. 

उलट्या होणे : वडाच्या पारंब्यांची बुकटी करून खाल्यास उलट्या कमी होतात. 

गर्भपात होणे : वडाची सुकलेली साल बुकटी करून दुधामध्ये किंवा त्याच्या साईमध्ये मिसळुन आणि मधासोबत खाल्यास गर्भ राहण्यास मदत होते .